जसा मुंबईकर, पुणेकर तसाच डोंबिवलीत राहणारा 'डोंबिवलीकर'. सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक चळवळीचे केंद्र म्हणून डोंबिवलीची ओळख आहे. अनेक व्यक्ती, संस्था संघटना यांच्या कार्यातून आज डोंबिवलीचे नाव सर्वश्रुत आहे. २७ मार्च २००९ ला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 'डोंबिवलीकर' नावाचा 'ब्रॅण्ड' उदयाला आला. कुठल्याही राजकीय व हॉट विषयाला हात न घालता मासिक चालू ठेवायचं हा निर्णय आजही ठाम आहे. डोंबिवलीच्या साहित्य विश्वातील दिग्गज आमचे शन्ना, आबासाहेब पटवारी, ज्येष्ठ पत्रकार श्री. सुधीर जोगळेकर, कै. सुरेंद्र बाजपेई सर अश्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत डोंबिवलीकर मासिकाची सुरुवात झाली. नंतर या परिवाराच्या माध्यमातून या परिवाराचे वेगळेपण असं की 'डोंबिवलीकर' हे एक सर्वसमावेशक असं कुटुंब आहे.

डोंबिवलीकर मासिक, डोंबिवली नगरीचं प्रतिबिंब ठरलेली डोंबिवलीकर दिनदर्शिका, दिवाळी अंक, याचबरोबर विविध कलागुणांना वाव देणारे 'डोंबिवलीकर-एक सांस्कृतिक परिवार' असे खुले व्यासपीठ उभारले आहे. विशेष म्हणजे डोंबिवलीकर ही संपूर्णपणे अराजकीय पण सांस्कृतिक चळवळ आहे. राजकारणातील ''र'' इथे उच्चारला जात नाही की लिहीला जात नाही.

आम्ही दरवर्षी गुढीपाडव्याला म्हणजेच 'डोंबिवलीकर'च्या वर्धापनदिनाला डोंबिवली नगरीतील विविध क्षेत्रांतील 50 मान्यवरांना त्यांनी मिळवलेल्या यशासाठी, केलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी 'आदर्श डोंबिवलीकर' हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करत असतो.

डोंबिवलीसारख्या कलासक्त नगरीतील लोकांचा कलाविषयक दृष्टिकोन लक्षात घेऊनच 'डोंबिवलीकर' परिवारानं पाच वर्षांपूर्वी 'गुलाब प्रदर्शन' आयोजित केलं होतं. तर जनतेचा विशेषत: महिला वर्गाचा उत्साह व सहभाग पाहूनच डोंबिवलीकरनं डोंबिवलीत 'रोझ सोसायटी' ची स्थापना करून नागरिकांना या क्षेत्रातील सर्व घडामोडींची माहिती मिळण्याची व्यवस्था केली.

डोंबिवलीकर परिवारानं वेळोवेळी कलाकारांना, त्यांनी मिळवलेल्या यशासाठी त्यांचा जाहीर सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याची प्रथा सुरू केली. या प्रथेला अनुसरून डोंबिवलीकर परिवारानं आतापर्यंत प्रशांत दामले यांच्यासारख्या अनेक कलाकारांचा सत्कार केला आहे.

Latest Issue / Event


याच वाटेवरील पुढचं पाऊल म्हणून रवि जाधव, मृणाल कुलकर्णी, समीर गायकवाड अशा कलावंतांना जाणीवपूर्वक 'प्रमोट' करण्याचा आपल्या परीनं प्रयत्न केला आहे.

'डोंबिवलीकर-एक सांस्कृतिक परिवार' आता दशकपूर्ती वर्षात पदार्पण करीत आहे. आजपर्यंतच्या या सांस्कृतिक चळवळीत अनेक प्रतीथयश लेखक, कलारसिक वाचक, आमचे शुभचिंतक जाहिरातदार आणि संपूर्ण डोंबिवलीकर परिवाराची टीम हेच खर्या अर्थाने साक्षीदार आहेत ज्यांच्यामुळे हा परिवार वाढला व डोंबिवलीला साहित्यिक वर्तुळात संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर व विदेशातही सांस्कृतिक अग्रभागी ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली. सर्वांचे पुनश्चः धन्यवाद !!!

Some of Dombivlikar Magazines & Diwali Ank
Testimonials
  • गेली २२ वर्षे मी व्यवसाय करत आहे. कॅलेंडरच्या माध्यमातून माझा उद्योग लोकांसमोर पोचल्याने समाधान वाटत असून माझ्या कष्टाचे चीज झाले आहे. डोंबिवलीतील उद्योजकांचा समग्र संग्रह या कॅलेंडरमध्ये बघायला मिळत आहे. नवीन उद्योजकांना हे कॅलेंडर प्रेरणादायी ठरेल. डोंबिवलीकरचे हे कॅलेंडर हा अभिनव प्रयोग आहे.

    कष्टाचे चीज- मनोज क्षीरसागर
  • डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवारचा दिनदर्शिकेचा प्रयोग अत्यंत स्तुत्य आहे. डोंबिवलीतील सर्व उद्योजकांना या निमित्ताने एका व्यासपीठावर आणण्यात आले आहे. या उद्योजकांना याचा निश्चित फायदा होणार असून या निमित्ताने उद्योगाचा प्रसार होत आहे. सर्व शहरांनी " डोंबिवलीकर " चा आदर्श घेऊन असा प्रयोग केला पाहिजे असे वाटते.

    सर्वांनी प्रयोग करावा- जयंत फलके
  • हा अंक खरच सर्वांग सुंदर होता.छपाई,कागद, मांडणी उच्च कोटीची. सर्व संबधितांनी घेतलेल्या मेहनतीला तोड नाही.या अंकातून खूप चांगल्या गोष्टींची माहिती मिळाली .

    श्री अजित खैरनारएक वाचक

Our Well Wisher Advertisers