नृप्स - विदेशस्थ डोंबिवलीकरांच्या पालकांचा सपोर्ट ग्रुप

विदेशात शिक्षण किंवा नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने गेलेल्या डोंबिवलीकर तरुण तरुणींच्या पालकांची संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरु झाला आहे.
अशा पालकांची मोठी संख्या डोंबिवलीत असून त्यातल्या अनेकांना विविध कामांसाठी मदतीची गरज असते. प्रसंगी पैसे खर्च करूनही छोटी मोठी कामे करण्यासाठी विश्वासू मदतनीस मिळत नाहीत, अशी अनेकांची तक्रार आहे. अशा गरजू पालकांच्या अडचणी वारंवार कानावर येत राहील्याने अशा पालकांनीच एकत्र यावे आणि डोंबिवलीकरच्या मदतीने परस्परांच्या मदतीसाठी सपोर्ट ग्रुप स्थापन करावा, अशा विचाराने चव्हाण यांनी हे पाऊल उचलले आहे. म्हणूनच डोंबिवलीतील पालकांचा नृप्स ( नॉन रेसिडेंट इंडियन पेरेंट्स सोसायटी ) नावाचा सपोर्ट ग्रुप स्थापन करायचा निर्णय घेण्यात आला .
आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासह बापूसाहेब मोकाशी , सुधीर जोगळेकर, आबासाहेब पटवारी , सुरेश पुराणिक, डॉ . अरुण नाटेकर , अनुराधा मोहिदेकर , श्रीपाद कुलकर्णी, डॉ. सुनील पुणतांबेकर, प्रभु कापसे इ . यांच्या पुढाकाराने या ग्रुपची स्थापना झाली.
विदेशस्थ डोंबिवलीकरांच्या पालकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले आहे .

एन आर आय पेरेन्टस सोसायटी Participation form

Some of Dombivlikar Magazines & Diwali Ank
Testimonials
  • गेली २२ वर्षे मी व्यवसाय करत आहे. कॅलेंडरच्या माध्यमातून माझा उद्योग लोकांसमोर पोचल्याने समाधान वाटत असून माझ्या कष्टाचे चीज झाले आहे. डोंबिवलीतील उद्योजकांचा समग्र संग्रह या कॅलेंडरमध्ये बघायला मिळत आहे. नवीन उद्योजकांना हे कॅलेंडर प्रेरणादायी ठरेल. डोंबिवलीकरचे हे कॅलेंडर हा अभिनव प्रयोग आहे.

    कष्टाचे चीज- मनोज क्षीरसागर
  • डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवारचा दिनदर्शिकेचा प्रयोग अत्यंत स्तुत्य आहे. डोंबिवलीतील सर्व उद्योजकांना या निमित्ताने एका व्यासपीठावर आणण्यात आले आहे. या उद्योजकांना याचा निश्चित फायदा होणार असून या निमित्ताने उद्योगाचा प्रसार होत आहे. सर्व शहरांनी " डोंबिवलीकर " चा आदर्श घेऊन असा प्रयोग केला पाहिजे असे वाटते.

    सर्वांनी प्रयोग करावा- जयंत फलके
  • हा अंक खरच सर्वांग सुंदर होता.छपाई,कागद, मांडणी उच्च कोटीची. सर्व संबधितांनी घेतलेल्या मेहनतीला तोड नाही.या अंकातून खूप चांगल्या गोष्टींची माहिती मिळाली .

    श्री अजित खैरनारएक वाचक

Our Well Wisher Advertisers